Quantcast
Channel: Marathi Aarti Sangrah – Marathi Unlimited
Viewing all 111 articles
Browse latest View live

पसायदान व अर्थ !

$
0
0

Pasaydan and its MeaningMarathi Pasaydan and Its Meaning , Ata wishawstkedeve, yene wagyadhe toshawe

सुप्रसिद्ध सांप्रदायातील  श्री सार्थ ज्ञांनेश्वरीतील अठरावा अध्यायातील पसायदान व अर्थ !

आता विश्र्वात्मकें देवें । येणें वागयज्ञे तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।
जे खळांची व्यंकटी सांडो ।  सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परें पडो मैत्र जीवांचें ।।
दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें  वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।
वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।
चला कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव पीयूषाचे ।।
चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं । भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें । दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।
तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।

अर्थ –! आता, सर्व विश्वाचा आत्मा जो परमेश्वर त्यानें या माझ्या वागयज्ञरूप सेवेनें प्रसंन्न होऊन मजवर हा प्रसाद करावा. खलजनांच्या दुष्ट बुद्धीला पालट पडून त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न व्हावी. व सर्व भुतांच्या ठिकाणी परस्परां बद्दल मित्रभाव नांदावा. पातकरूप अंधकाराचा नाश होऊन जगात धर्मरूप सुर्याचा उदय असो; व प्राणी मात्रांच्या सदिच्छा फलद्रूप होवोत. ईश्वरनिष्ठांचा समुदाय भूतलावर सकल मंगलांचा अखंड वर्षाव करीत असलेला सर्व भूतांना भेटो. ती संतमंडळी म्हणजे चालते कल्पतरुंचे बाग चेतन चिंतामणीचे गांव व अमृताचे बोलते होत. निष्कलंक चंद्र, अतापदायी सूर्य, असे जे सज्जन ते सर्व लोकांच्या प्रेमाचे स्थान असो. किंबहुना, त्रैलोक्य सुखी होऊन त्यांनी विश्व पालक जो आदी पुरुष त्याचे अखंड भजन करावें. आणि विशेषत: येथें हाच ग्रंथ ज्यांनी आपले उपजीव्य मानिले आहे. (सर्वाधार, तारक) त्यांना दृष्ट व अदृष्ट विजय सुखांचा लाभ घडत जावा. तेव्हा , सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसंन्न होऊन म्हणाले. ” तथास्तु ”; तुझी हि ईच्छा सफल होईल; असा तुला प्रसाद आहे; त्यायोगे ज्ञांनेश्वर महाराज सुखी झाले.

Source : Marathi Unlimited.


जे जे असेल प्राल्ब्धी

$
0
0

marathi abhang

जे जे असेल प्राल्ब्धी । तें न चुके कर्म कधी ।
होणारा सारखी बुद्धी । कर्म रेषा प्रगटे ।।
न कळे पुढील होणार । भुत-भविष्य हा विचार ।
कर्म-धर्म तदनुसार । भोगणे लागे सर्वथा ।।
ऐसा लिहून गेला विधाता । मग कासया करावी चिंता ।
आपुलिया संचिता । कर्म रेषा प्रमाण।।
जैसें असेल आचरण । घडले असेल पाप-पुण्य ।
तैसे सानुकूल होतील कर्म । मान-अपमान जन करीता।।
काल अनुकूल अथवा प्रतिकूल । परी सोडू नये आपुले धैर्यबळ ।
अनाचारी मन केवळ । नये बाटवू  सर्वथा ।।
अखंड वाणी हरि स्मरणी । सुख विश्रांती कीर्तनी ।
खेचर विसोबा म्हणे प्राणी । मनुष्य देह दुर्लभ ।।६।।

छंदे छंदे तीर्था जासी

$
0
0

marathi abhang

छंदे छंदे तीर्था जासी । परी अविद्यासि न सांडिसी ।
वायां आत्मरूप कष्टविसी । तेणें न पावसी रे नित्य सुख ।।
ध्यान धारणा मुद्रा जप । यम नियम करिसी तप ।
तेणें तुझी न चुके खेप । आराधी स्वरूप एकभावे ।।
पर स्त्री तितुकी जाण  रे माता । एसें मनी मानी रे तत्वतां ।
पर  द्रव्य येऊ देऊ नको रे चित्ता । मग गुरु नाथा सेवि तया ।।
तो सांगेल गर्भखून । तेणें तुज होईल आत्म ज्ञान ।
फिटेल भ्रांती देखसी निरंजन ।शून्य भुवन देहा माजी ।।
तेथून सुनीळ प्रकाशु । सोहं गर्जना रात्रंदिवसु ।
आणिला राजा परमपुरुषु । भोगी रहिवासु आत्मज्ञानी ।।
हे जरी सत्य न मानिती मनी । ते नर पुढती येती ये जनी ।
खेचर विसा करी विनवणी । कोप न धरी रे नामया ।।६।।
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल …..

पौराणिक गीत गाणी

$
0
0

Pandurang Rathoutsava in Gulbarga

(Kshtriya Mhanwine ani Pathishi Ghay Sahane)

क्षत्रिय म्हणविणे आणि पाठीशी घाय साहणे ।।
बोलता लागीवाने आहें जी देवा ।।४।।
पितृभक्त म्हणविणे आणि पितृआज्ञां न पाळणे ।।
बोलता लाजिरवाणे आहे जी देवा ।।५।।
ऐसे भक्त किती गेले अधोगती ।।
नामा म्हणे श्रीपती दास तुझा ।।६।।
……………………………………………………………………………………

(Dadi Jadibuti Jaran Maran)
दावी जडीबुटी जारण मारण । नागवे हिंडणे काज काज ।।
दावी उग्र तप  केले उपवास । फिरतांहि देश काय काज ।।
काय काज तरी होशील फजिती । स्मरारे अनंत सर्व काळ ।।
नामा म्हणे नव्हे उदंड उपाऊ । धरी आधी पाय विठोबाचे ।।४।।
……………………………………………………………………………………

(lamb lamb kay sangashil gosti)
लांब लांब काय सांगशील गोष्टी ।करी उठाउठी निरभिमान ।।
मितूपण  जव दंभ गेला नाही । साधिलें त्वां  न कांही तत्वसार ।।
अहंभाव देही प्रपंच्याचे दृष्टी । काय चाले गोष्टी रोकडी ते ।।
नामा म्हणे ऎसे नेणती विचार । जाती निरंतर यमंपंथे ।।४।।
……………………………………………………………………………………

(Mukhi Nam Hati Tali)
मुखी नाम हाती टाळी । द्या नुपजे कोणे काळी ।।
काय करावे ते गाणें । धिक धिक तें लाजिरवाणे ।।
हरिदास म्हणोनी हळवी मान । कवडीसाठि घेतो प्राण ।।
हरिदासाचे पायी लोळे । केशी  धरोनी कापी गळे ।।
नामा म्हणे अवघे चोर । हरी नाम हें थोर ।।५।।
……………………………………………………………………………………

(Chandra Suryadi Bimb)
चंद्र-सुर्यादि बिंब लिहीताती सांग । परी प्रकाशाचे अंग लिहिता न यें ।।
संन्यासाची सोंगे आणिताती सांग । परी वैराग्याचे अंग आणितां न यें ।।
नामा म्हणे कीर्तन करिताती सांग । परी प्रेमाचे तें अंग आणीत न यें ।।३।।
……………………………………………………………………………………

(Hari bhakt athile ekse te uttam)
हरी भक्त आथिले ऐसे ते उत्तम । येर ते अधम अधमाहुनी ।।
हरीभक्त सप्रेम तेंचि तैसे नाम । येर ते निनामे अनामिक ।।
नामा म्हणे जया नाही तरी हरिसेवा । तें जितचि केशवा प्रेत वाणे ।।३।।
……………………………………………………………………………………

(Murk Baisale Kirtani)
मूर्ख बैसले कीर्तनी । न कळे अर्थाची करणी ।।
घुबड पाहे भलतीकडे । नाईके  नामाचे पवाडे ।।
पांहू ईच्छी परनारी । चित्त पादरक्षां वरी ।।
नामा म्हणे सांगू किती । मूढ सांगितले नायकती ।।४।।
……………………………………………………………………………………

(Sang Khota prnaricha)
संग खोटा परनारिचा । नाश होईल या देहाचा ।।
रावण प्राणासी मुकला । भस्मासुर भस्म जाला ।।
गुरु पत्नीशी रतला । क्षय  रोग त्या चंद्राला ।।
ईन्द्रा अंगी सहस्त्र भगें ।नामा म्हणे विषयासंगे ।।४।।
……………………………………………………………………………………

(Lavanya Sundar rupachi brwi)
लावण्य सुंदर रूपाचे बरवी । पापिन जाणावी ते कामिनी ।।
देखता होतसे संगाची वासना । भक्ताच्या भजना नाश होय ।।
ऎसी  जे घातकी जन्म कासयासी । चांडाळीण तिसी नरक प्राप्त ।।
नामा म्हणे तिचे पाहू नये  तोंड ।। पापिन ते रांड बुडवी नरा ।।४।।
……………………………………………………………………………………

(Kaya rupi jiche Hinwt Ati)
काया रूप जिचे हिणवट अति । माउली धन्य ती आहे नारी ।।
तियेवरी मन कदापि न जायें । भजना न होये कडा चळ ।।
ऐसिये माउली परउपकारी । घात हा न करी भजनाचा ।।
नामा म्हणे तिचे चरण वंदावे । वदन पहावें  माउलीचे ।।४।।
……………………………………………………………………………………

नमन लंबोधरा

$
0
0

marathi abhangमराठी सारस्वतात मराठीतील आद्य आत्म चरित्रकार म्हणून प्रसिद्ध झालेले श्री संत नामदेव माहाराजांच्या प्रसिद्ध गाथे मधील काही अभंग;…
।। नमन लंबोधरा ।।
प्रथम नमन करू गणनाथा । उमाशंकराचीया सुता ।
चरणावरी ठेउनी माथा  । साष्टांगी आता दंडवत ।।
दुसरी वंदू सारजा । जे चतुराननाची आत्मजा ।
वाकसिद्धी पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत ।।
आता वंदू देव ब्राम्हण । ज्यांचेनी पुण्य पावन ।
प्रसंन्न होऊनी श्रोते जन । त्या माझे नमन दंडवत ।।
आतां  वंदू  साधूसज्जन । रात्रदिवस हरीचे ध्यान ।
विठ्ठलनाम उच्चांरिती जन त्या माझे नमन दंडवत ।।
आता नमू रंग भूमिका  । कीर्तनीं  उभी लोका ।
ताळ मृदुंग श्रोते देखा । त्या माझे दंडवत ।।
ऐसे नमन करुनी सकळा । हरी  बोले बोबड्या बोला ।
अज्ञान म्हणुनी आपल्या बाळा । सकळा  नामा म्हणे ।।६।।
……………………………………………………………………………………
(Lambodhara Tuj shudand)

लंबोधरा तुज शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चीन्हांचा ।।
चतुर्भुजे आयुधें शोभताती हाती । भक्ताला रक्षिती निरंतर ।।
भव्यरूप तुझे उंदीर वाहना । नमन चरणा करीतसे ।।
तुझे नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या नामें ।।
चौदा विद्या तुझे कृपेने येतील । मुके बोलतील वेदघोष ।।
रुणझुण पायी वाजताती वाळे । एकोणी भुलले मन माझे ।।
भक्तवत्सला एकें पार्वतीनंदना । नमन चरनां करीतसें ।।
नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती । वर्णीतसे कीर्ती कृष्णाजीची ।।८।।
……………………………………………………………………………………
।। नमन सरस्वती माते ।। (Naman Saraswati Mate)
सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती  ।  येतों काकुलती तुजलागीं ।।
लाडके लडिवाळ मागतसे तुज । वंदिन हे रज चरणींचे ।।
त्वरें येउनिया मस्तकी ठेवी हात । जाईल हि भ्रांत तेव्हां माझी ।।
आपुल्या बाळासी धरी आतां हातीं । न करी फजिती जनामध्यें ।।
विश्वात्मा जो हरि त्याची वर्णीन कीर्ती । आवडीचा ओती रस यातें ।।
ऐकोनियां स्तव प्रसंन्न । नाम्या तुझा अभिमान मजलागीं ।।६।।
……………………………………………………………………………………
(Deva adideva Sarvatrachya Jiva)

देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐके वासुदेवा द्यानिधी ।।
ब्रम्हा आणि ईन्द्र वंद्य सदाशिव  । ऐकेवासुदेवा दिनबंधु ।।
चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा ।ऐके  वासुदेवा कृपासिंधु ।।
योगियांचे ध्यानी नातुडसी देवा । ऎके वासुदेवा जगद्गुरू ।।
निर्गुण निराकार नाही तुज माया । एकें कृष्णराया कानडिया ।।
करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोया । एकें कृष्णराया गोजरीया ।।
नामा म्हणे जरी दाखवीशील पाया । तरी वदावया स्फूर्ती चाले ।।७।।
……………………………………………………………………………………
(Kshirsagrat asshi Bisala)

क्षिरसागरात  असशी बैसला । धावोनी मजला भेटी देई ।
शेषावरी जरी असशी निजला । धावोनी  मजला भेटी देई ।
कैलाशी शिव पुजीतसे तुजला  । धावोनी मजला भेटी देई ।
योगियांचे ध्यानी असशी  बैसला । धावोनी मजला भेटी देई ।
गहिवरोनि नामा बाहात विठ्ठला । धावोनी मजला भेटी देई ।।५।।
……………………………………………………………………………………
(Adakhluni pdashi Nako Joda)

अडखलूनी पडशी घालू नको जोडा । धांवत दुडदुडा येई आतां ।।
बैसावया साठी घेऊ नको घोडा । धांवत दुडदुडा येई आतां ।।
भोजना बैसलासी येथें घेई विडा ।। धांवत  दुडदुडा येई आतां ।।
बाहुबळे काढीला देवांचा जो खोडा । धांवत  दुडदुडा येई आतां ।।
कृपाळु बहुत लक्ष्मीचा चुडा । त्याला बाह्तसे वेडा नामदेव ।।५।।

……………………………………………………………………………………

(Akashi wani hoy sange saklasi)

आकाशी वाणी होय सांगे सकलांसी । तळमळ मानसी करू नका ।।
देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राम्हण गाई  भक्त ।।
उतरील भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांसी करील तो ।।
रोहिणी उदरी शेष बळिभद्र । यादव समग्र व्हावे तुम्ही ।।
ऐकोनियां ऐसें आनंद मानसिं । येती स्वस्थळासी नामा म्हणे ।।५।।
……………………………………………………………………………………
(Sheshapati bole lakshmicha to war)

शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊ आतां ।।
पृथ्वीवरी दैत्य ते मातले फार । गार्हाणे सुरवर सांगू आले ।।
शेष म्हणे मज श्रम जाले फार । या लागी अवतार मी न घेचि ।।
राम अवतारी जालो लक्षुमन ।  सेविलें अरण्य तुम्हा सवें ।।
चौदा वर्षांवरी केले उपोषण । जाणता आपण प्रत्यक्ष हें ।।
नामा म्हणे ऐसे वडे धरणीधर । हांसोनी श्रीधर काय बोलें ।।६।।
……………………………………………………………………………………

(Purvi tu anuj jalasi kanista)

पूर्वी तू अनुज जालासि कनिष्ट । सोसियेले  कस्त मजसवें ।।
आतां तू वडील होई गा सर्वज्ञां । पाळीन मी आज्ञां तुझी बारे ।।
देवकी उदरी राहावें जांवोनी । मायेसी मागोनि पाठवितो ।।
योगमाया तुज काढील तेथोन । घालील नेवोन गोकुळासी ।।
लक्ष्मीसी सांगे तेव्हां हृषीकेशी । कौंडण्यपुराशीं जावे तुम्हीं ।।
नामा म्हणे ऎसा करुनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असें ।।६।।

The post नमन लंबोधरा appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता

$
0
0

shri datta guru aarati

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

The post जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

गणपती आरती संग्रह

$
0
0

ganapati images

(१)
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ॥
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ जय देव० ॥ ३ ॥

(२)
नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें ।
लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।
ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं ।
कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥ जय देव जय देव० ॥३॥

(३)
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥
अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई ॥
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबहारी ॥जय० ॥२॥
भावभगतिसे कोई शारणागत आवे ।
संतति संपति सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भवे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥

(४)
तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया ।
संकटीं रक्षीं शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥ ध्रु० ॥
मंगलमूर्ति तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धिविनायक ॥
तुझिया द्वारीं आज पातलों । नेईं स्थितिप्रति राया ॥ संकटीं० ॥१॥
तूं सकलांचा भाग्यविधाता । तूं विद्येचा स्वामी दाता ॥
ज्ञानदीप उजळून आमुचा । निमवीं नैराश्याला ॥ संकटीं० ॥२॥
तूं माता, तुं पिता जगं या । ज्ञाता तूं सर्वस्व जगीं या ॥
पामर मी स्वर उणें भासती । तुझी आरती गाया ॥ संकटीं ॥३॥
मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरया ॥

(५)
जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा ॥ ध्रु० ॥
प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा ।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीळा ॥
रुणझुण रुणझुण करिती घागरिया घोळा ।
सताल सुस्वर गायन शोभित अवलीळा ॥ जय देव० ॥ १ ॥
सारीगमपधनी सप्तस्वरभेदा ।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥
तातक तातक थैय्या करिसी आनंदा ।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय देव० ॥ २ ॥
अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।
परशांकुशलड्डूधर शोभितशुभरदना ॥
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करिं भ्रमणा ॥
जय देव जय देव जय वक्र० ॥ ३ ॥

Gallary- ganapati images ganapati images ganapati images ganapati images v ganapati images ganapati images ganapati images ganapati images ganapati images ganapati images ganapati images ganapati images ganapati images

The post गणपती आरती संग्रह appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

यादवांचे कुळी झोंड जे जन्मले

$
0
0

yadavanchya kuli zond je janmale, sant namdev maharaj abhang..

namadeva

अभंग

यादवांचे कुळी झोंड जे जन्मले । नाही ऐसे केले मागें पुढे ।।
दॆईगा विठोबा आमुचें ठेवणे । सकळांचे  ऋण नेदों पाह्सी ।।
आमुचे साधू आहेत सज्जन । तुमचा जमान कोठें देवा ।।
नामयाचा महादा बळकट पै जाला ।विठोबा आणिला चौबारांत ।।४।।

The post यादवांचे कुळी झोंड जे जन्मले appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


इतुलें करीं देवा

$
0
0

Etule Kari Deva  genius partly lies in his ability to transform the external world into its spiritual analogue.
TUKA1

इतुलें करीं देवा एकें हे वचन | समूळ अभिमान जाळीं माझा ||

इतुलें करी देवा एकें हे गोष्टी | सर्व सम दृष्टी तुज देखें ||

इतुलें करी देवा विनवितों तुज | संतचरणरज वंदी माथां ||

इतुलें करी देवां एकें हे मात | हृदयी पंढरीनाथ दिवसरात्री ||

भलतियाभावें तारी पंढरीनाथा | तुका म्हणे आतां शरण आलों ||

काय कीर्ती करुं लोक दंभमान | दाखीवी चरण तुझे मज ||

मज आतां एसें नको करुं देवा | तुझा दास जावा वांयाविण ||

होईल थोरपणे जाणीवेचा भार | दुरावेन दूर तुझ्यापायिं ||

अंतरीचा भाव काय कळें लोकां | एक मानी एका देखोवेखीं ||

तुका म्हणे तुझे पाय आतुडती | त्या मज विपत्ती गोड देवा ||

The post इतुलें करीं देवा appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

देह देवाचे मन्दिर !

$
0
0

Deh Devache Mandir – TUKARAMACHE LOKPRIYA ABHANG deh devache mandi aat aatma parameshwar deh devache mandi aat aatma .

SantTukaramMaharajतुकाराम महाराज म्हणतात, स्त्री-पुरुषाचे देह हेम साक्षात् देवाचे पवित्र मंदिरच आहे. या शरीरात प्रत्यक्ष सर्व विश्वाचा ईश्वर सर्व समर्थ सो$हं परमात्मा अहर्निश अखमद वास करीत आहें. म्हणून प्रत्येकाने स्व:तच्या या देहांतच स्वत:चा सर्व समर्थ अतुल वैभवशाली सो$हं परमात्म्याचे दर्शन घ्यावे. म्हणजे तुमचे केवढे अपरंपार सामर्थ्य आहें हे तुम्हाला स्पष्ट कळून येईल.  उदा. प्रत्येक लाकडात जसा अग्नी असतोच पण तो सुयोग्य घर्षणाने प्रगट होतो. तसाच प्रयेक स्त्री-पुरुषात सर्व व्यापी सर्व समर्थ सो$हं परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे. त्याला सो$हं ज्ञान चिंतनाने प्रगट करावे लागते. * सो$हं-ब्रम्ह हेच आपले खरे मूळ दिव्य रूप आहें. व या आपल्या सो$हं ब्रम्ह स्वरूपांचे अखंड अनुसंधान, घ्यान, चिंतन स्मरण हेचं खरे दिव्य ‘आत्मशिक्षण’ (आटो एज्युकेशन )आहे.

The post देह देवाचे मन्दिर ! appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

श्री मंगळागौरीची आरती

$
0
0

Shree MangalaGaurichi Aarti – This Arti is used to worship goddess mangalagauri. Mangalagauri is worshiped as the Goddess of benevolence or Kindness/ compassion .

mangala_gauri

जयजय माये मंगळागौरी | तुजला पुजू अंतरी नानाविधी उपचारी | दीप ओवाळू सुंदरी || जयजय||

मंगलानाम तुझे || तुला नमन असो माझें | भव दुखा:चे हे ओझें देवी उतरावें सहजें ||१||

गजाननाची तुं माता || शंकराची प्रीयकांता || हिमालयाची तुं  दुहितां | मज तारीं तारीं आतां ||२||

लागे तुझ्या चरणाशीं || जाळीं पापांचीया  राशीं|| भक्ती ठसावी मानसीं | बे न्यावे पायांपाशी ||३||

गौरीं ओवाळीते दीप | नेणें तुझें नाम रूप || वाढवावे सौभाग्य अमूप | विश्वाची तू मायबाप ||४||

रिकामी हि खटपट | शुद्धमार्गी लावीं निट || परब्रम्ह घनदाट |द्यावीं नारायणी भेंट ||

जय माये मंगळागौरी | तुजला पुजूं अंतरी ||५||

The post श्री मंगळागौरीची आरती appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

||श्री हरितालिकेची आरती ||

$
0
0

Shri Hartalika Aarti is sung to worship Mata Parvati (Also called as Mata Gauri) on the occasion of Hartalika Teej. This Vrat is is observed by both married and unmarried women. There is a legend behind the ritual to perform Hartalika Vrat :- To get God  Shiva as husband, Mata parvati did very tough penance for many years. After doing very difficult penance, finally lord Shiva pleased by her vrat and married her. Since then Mata parvati is worshipped as Hartalika.

Hartalika

जयदेवी जयदेवी हरितालिके  सखी पार्वती अंबिके | आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके ||धृ||

हर अर्धांगी वससी जासी यज्ञां माहेरासी | तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी गुप्त होसी || १||

रिघसी हिमाद्रीच्या पोटी कन्या होसी तुं गोमटी | उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठाउठी || २||

तपपंचाग्नि  साधने धुम्रपान अधोवदने | केली बहु उपोषणे शंभू भ्रतारा कारणे || ३||

लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी | पुन्हा वरिसी घुर्जटी मन रक्षावे संकटी || ४||

काय वर्णू तवगुण अल्पमती नारायण | मातें दाखवी चरण चुकवावे जन्म मरण || ५||

The post || श्री हरितालिकेची आरती || appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

श्री नवनाथाची आरती

$
0
0

This Aarti is sung to worship Navnath ie nine saints of Nath sampradaya in maharashtra collectively. Navnath includes  machhindranath, Goraksha-Natha, Jalandhar-Nath, Kanifanath, Charapati-Nath, Naganath, Bhartari-Nath, Revan-Nath, Gahininath.

Navnath

जयदेव जयदेव जय नवनाथा | भक्तगण देवूनी सिद्ध करा || धृ ||

मच्छिंद्र गोरख तैसे जालींद्र्नाथ | कानिफ गहिनीनाथ नागेशासहित |

चर्पटि भर्तरी रेवण मिळूनी नवनाथ | नवनारायण अवतारा संत ||१||

भक्ती शक्ती बोध वैराग्यहित | तापत्रय ते हरिती स्मरा एकचित्त |

नमने चरित्र पठणे दुरितांचा अंत | भक्त जनांसी तारी नवनाथ खचित ||२||

इह्पर साधुनी देती समस्त नवनाथ | भूत समंधा प्रेता घालवीती सत्य |

भक्त जणांचे पूर्वा तुम्हीच संकल्प | कृपार्थ होता दावा सदानंद रूप ||३||

दु:खी दिन दरिद्री लोकांना तारा | देउनि सुख संपत्ती मुक्ती दोहि करा|

स्मरण करावे आता नित्य नवनाथा | शरणागत मी तुमच्या पायी मम माथा||४||

नवनाथची आधार सकलांचा आता | आरती ओवाळीता हरली भवचिंता |

ब्रम्ह सनातन शांती देई मम चित्ता | शरण विनायक लोटांगण आता ||५||

The post श्री नवनाथाची आरती appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

श्री दत्ताची आरती

$
0
0

This aarti is sung to worship Shree dattatreya Bhagwan. Shree dattatreya is considered to be the incarnation of  three gods Bramha, Vishnu and Mahesh ie, Shiva.

1421_dattatreya-wallpaper-01

त्रिगुणात्मक  त्रैमूर्ती दत्त हा जाणा | त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा |

नेतिनेती शब्दे नये अनुमाना | सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ||

जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता | आरती ओवाळीता  हरली भवचिंता ||धृ || १ ||

सभाही अभ्यंतरी  तू एक दत्त | अभाग्यासी कैसी कळेल हि मात  |

पराही परतली तेणे कैसा हा हेत | जन्म मरणाचा पुरलासे अंत ||जय ||  २||

दत्त येउनिया उभा ठाकला | सद्भावे साष्टांगेसी प्रणिपात केला |

प्रसन्न होवूनिया आशीर्वाद दिधला |जन्म मरणाचा फेरा चुकविला ||जय|| ३||

दत्त दत्त ऎसे लागले ध्यान | हरपले मन जाहले उन्मन |

मी तू पणाची झाली बोळवण | एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ||जय|| ४||

The post श्री दत्ताची आरती appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

||श्री पांडुरंगाची आरती||

$
0
0

To worship Pandurang or Vitthal , following aarti is sung. Vittal is a Hindu deity mostly worshipped in Maharashtra. It is also considered as incarnation of Shree Vishnu or  his another incarnation ShreeKrishna accompnied by Rakhumai. Pandharpur is the village which is considered as a main place of  Panduranga.

vittal

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |

पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आलें गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ||

जयदेव जयदेव जय पांडुरंगा |  रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पांवे जिवलगा ||जयदेव || १||

तुळसी माळां गळां कर ठेउनी कटी | कांसे पितांबर कस्तुरी लल्लांटि |

देव सुरवर नित्य येतां भेटी | गरुड हनुमंत पुढे उभें राहती ||जय २||

धन्य वेणूनाद अनुक्षेत्र पाळा || सुवर्णाची कमलें वनमाळा गळां |

राई रखुमाबाई राणीया सकळा | ओवाळीत राजा विठोबा सावळा ||जय||३||

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती |चंद्रभागे माजी सोडूनियां देती |

दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णावा किती ||जय ४||

आषाढी कार्तिकी भक्तजन येतीं |चंद्रभागे माजी स्नान जे करिती |

दर्शन हेळां मात्रे तया होय मुक्ती |केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ||जय ५||

The post ||श्री पांडुरंगाची आरती|| appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


||गजानन महाराजांची आरती ( सायं ) ||

$
0
0

Shree Gajanan Maharajanchi aarti is sung to worship Sant Gajanan maharaj. Sant Gajanan Maharaj was a saint in maharashtra. His temple is situated at Shegaon, Maharashtra.

Image3-Shree-Gajanan-Maharaj

जयजय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया | अवतरलासी भूवर जडमूढ ताराया ||जय||

निर्गुण ब्रम्ह सनातन अव्यय अविनाशी | स्थिरचर व्यापुनी उरले जे या जगतासी |

ते तू  तत्त्व खरोखर नि:संशय अससी | लीला मात्रे धरिले मानव देहासी ||जयदेव ||१

होऊन देसी त्याची जाणीव तू कवणा | करुनी ‘गणी गण गणात बोते’ या भजना |

धाता हरिहर गुरुवर तूची सुख सदना |जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना ||जयदेव ||२

लीला अनंत केल्या बंकट सदनास | पेटविले त्या अग्नी वाचुनी चिलमेस|

क्षणात आणिले जीवन निर्जल वापिस | केला ब्रम्हगिरीच्या गर्वाचा नाश ||जयदेव||३

व्याधी वारूणी केले कैका संपन्न | करविले भक्तालागी विठ्ठल दर्शन |

भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण | स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ||जयदेव|| ४

The post || गजानन महाराजांची आरती ( सायं ) || appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

गजानन महाराजांची आरती ( दुपारी )

$
0
0

Shree Gajanan Maharajanchi aarti is sung to worship Sant Gajanan maharaj. Sant Gajanan Maharaj was a saint in maharashtra. His temple is situated at Shegaon, Maharashtra.

gajanan

श्रीमद सद्गुरू स्वामी जयजय गणराया | आपण अवतरलासी जगी जडजीव ताराया ||धृ||

ब्रम्ह सनातन जे तू साक्षात | स्थावर जंगमि भरला तुम्ही ओतप्रोत |

तव लीलेचा लागे कवणा नच अंत | तुज वानाया नुरले शब्दही भाषेत  ||जय||||१|

वरीवरी वेडेपण ते धारण जरी केले |परी सतस्वरूपा आपुल्या भक्तां दाखविले |

निर्जल गर्दाड्सी जल ते आणविले |विहग नभीचे काननि आज्ञेत वागविले||जय|| ||२||

दांभिक गोसाव्याते प्रत्यय दावून | ज्ञानीपणाचा त्याचा हरिला अभिमान |

ओंकारेश्वरी क्षेत्री साक्षात दर्शन | नर्मदेने भक्तां करविले रक्षण|| जय||  ||३||

अगाध शक्ती ऐसी तव सद्गुरू नाथा | दुस्तरशा भव सागरी तरण्या दे हाता |

वारी सदैव अमुची गुरुवर्या चिंता | दास गणूच्या ठेवा वरद करा माथा ||जय|| || ४||

The post गजानन महाराजांची आरती ( दुपारी ) appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

||श्री गीतेची आरती||

$
0
0

To worship the great religious scripture of Hindu religion, ShrimadBhagwatGeeta below is the Aarti to sung.  ShrimadBhagwatGeeta is a 700- verses containg religious scripture of Hindu Dharma. it is a part of Great Epic Mahabharata. It entails the essence of life. it is the holy scripture of hindu’s and contains the conversation between Arjuna and ShreeKrishna.

geeta_logo

जयदेवी जयदेवी जय भगवतगीते  आरती ओंवाळू तुज वेदमातें ||धृ ||

सुख करणी दुख हरणी जननी वेदांची | अवघड तुझां महिमा महिमा नेणें विरिंची  |

तेंतू ब्रम्हीं तल्लीन होसी ठायींची | अर्जुनाचे भावें प्रगटे मुखींची ||१||

सात शतें श्लोक व्यासोक्तिसार |अष्टादशाध्याय इतुका विस्तार |

एक अर्धपाद करितां उच्चार | स्मरण मात्रे त्यांचा निरसे संसार ||२||

काय तुझा पार वर्णू मी दीन | अनन्यभावे तुज आलों मी शरण |

अनाथ करी माये कृपा करून | बाप रखुमादेवी वरदासमान ||३||

The post ||श्री गीतेची आरती|| appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

||श्री गंगेची आरती||

$
0
0

Ganga is the largest river in India. Ganga is considered as a holy rever in India.  Ganga is called as ‘Mata’ and treated as goddess. Thus to worship Gangamata,  following aarti is sung .

ganga-chalisa1

माते दर्शन मात्रे प्राणी उद्धरसी हरसि पातक अवघें जग पावन करिसी |

दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी हरहर आतां स्मरतो गती होईल कैसी ||

जय देवी जयदेवी जय गंगा माई पावन करिं मज सत्वर विश्वाचे आई ||धृ||

 

पडलें प्रसंग तैसी कर्मे आचरलो विषयांच्या मोहाने त्यां तची रत झालो |

त्यांचे योगें दुष्कृतसिंधुत बुडालो त्यां तुनि मजला तारिसी या हेतूनें आलों ||१||

 

निर्दय यमदूत नेती त्या समयी राखीं क्षाळी यम धर्माच्या खात्यांतील बांकी |

मत्संगती जन एवढे तारियले त्वां कीं उरलों  पाहें एकची मी पतितां पैकी ||२||

 

अधहरणे जय करुणे विनवतसे भावें नोपेक्षी मज आतां त्वत्पात्री घ्यावें|

केला पदर पुढें मी मज इतुके द्यावें जीवें त्या विष्णूच्या परमात्मनी व्हावें ||३||

The post ||श्री गंगेची आरती|| appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

||श्री मंगळागौरीची आरती ||

$
0
0

Shri Mangalagaurichi Aarti – This aarti is sung to worship Goddess Mangalagauri, which is assumed to be another name for Goddess Parvati. Especially women perform the rituals for their husband followed by performing aarti to Goddess MangalaGauri.

 

Shree Mangalagaurichi Aarti

जयदेवी मंगळागौरी |ओवाळीन सोनियाच्या ताटी |

रत्नांचे दिवे मानिकांच्या वाती| हिरे या मोती ज्योती ||धृ||

मंगलमूर्ती उपजली कार्या |प्रसन्न झाली अल्पायुषी राया |

तिष्ठली राज्यबाळी |आयोपण द्यावया ||१||

 पूजेला ग आणिती जाईजूईच्या कळ्या | सोळा तिकटी सोळा दुर्वा | सोळा परींची पत्री|

जाईजूई आबुल्या | शेवंती नागचांफे | पारीजातके मनोहरें|

गोकर्ण महा फुलें | नंदेटें तगरें | पूजेला गं आणिलीं||२||

साळीचे तांदूळ मुगाची डांळ | आळणी खिचडी रांधिती नारी |

आपुल्या  पतीलागीं |सेवा करिती फार ||३||

डूमडूम डूमडूम वाजंत्री वाजती |कळावी कांकणे गौरीला शोभती |

शोभती बाजूबंद  | कानी कापांचे गबें| ल्यायिली अंबा शोभे ||४||

न्हाउनि माखुनी मौनी बसली | पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली |

स्व्च्छ होऊनी बैसली |अंबा पुजूं बैसली||५||

सोनियाच्या ताटी घातिल्या पंच्यारती | मध्ये उजळती कापुराच्या वाती |

करा घुपदीप |आतां नैवद्य षड्रस पकवानें | ताटीं भरा बोणें ||६||

लवलाह तिघें काशीसी निघालीं | माउली मंगळागौर भिजवू विसरलीं|

मागुती परतुनीयां आलीं | अंबा स्वयंभू देखियली | दे

ऊळ सोनियाचे खांब हिरेयांचे | कळस मोतियांचे ||७||

 

The post ||श्री मंगळागौरीची आरती || appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

Viewing all 111 articles
Browse latest View live